Ad will apear here
Next
पीएनजी ज्वेलर्सचे हिंजवडी येथे नवीन दालन
‘पीएनजी ज्वेलर्स’च्या  हिंजवडी येथील  दालनाचे उदघाटन  अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्या हस्ते झाले. या वेळी  पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ व अन्य मान्यवर उपस्थित होते.

पुणे :  ‘पीएनजी ज्वेलर्स’ने पुण्यातील  आपले सहावे दालन हिंजवडी येथे सुरू केले असून या दालनाचे उदघाटन प्रसिध्द अभिनेत्री व माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेन यांच्या हस्ते झाले. या वेळी  पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ,कार्यकारी संचालक पराग गाडगीळ आदी मान्यवर उपस्थित होते.

हे नवीन दालन २५०० चौरस फूट जागेवर विस्तारले असून  येथे तरुण पिढीला आवडतील असे कमी वजनातील सोने व डायमंड ज्वेलरीची विस्तृत श्रेणी आहे. याशिवाय मीनाकारी, जडाऊ, कुंदन व खास यलो गोल्ड डायमंड, समकालीन व चांदीचे दागिने देखील येथे उपलब्ध आहेत.

पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ म्हणाले, ‘पीएनजी ज्वेलर्सचा प्रवास पुण्यातून सुरु झाला आणि म्हणूनच पुण्याचे आमच्या हृदयात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. हा वारसा पुढे चालवत असताना आमचे सहावे दालन पुण्यातील हिंजवडी येथे सुरु होत आहे याचा अत्यंत आनंद होत आहे. हा आमच्या ग्राहकांचा आमच्यावरील विश्वास आहे ज्यांनी पिढ्यानपिढ्या आम्हांस साथ दिली आहे. त्यांच्यामुळेच आम्ही जगभरातील आमचे २६ वे दालन उघडण्यास सज्ज आहोत. आधुनिक काळात विविध उद्योगांमध्ये महिलांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि म्हणूनच त्यांच्या दैनंदिन वापरासाठी सुसंगत योग्य अशी हलक्या वजनांच्या दागिन्यांची श्रेणी देखील येथे उपलब्ध असेल.

अभिनेत्री सुश्मिता सेन म्हणाली, ‘अनेक पिढयांपासून लोकांचा विश्वास जिंकलेल्या पीएनजी ज्वेलर्ससारख्या ब्रँडसोबत जोडले जाणे माझ्यासाठी सन्माननीय गोष्ट आहे.एक महिला म्हणून दागिने परिधान करायला मला खूप आवडतात आणि दागिन्यांची आवड असणाऱ्यांसाठी हे एक परिपूर्ण दालन आहे. पीएनजी ज्वेलर्सचे त्यांच्या या यशाबद्दल मी अभिनंदन करते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते.

पीएनजी ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक पराग गाडगीळ म्हणाले,‘पीएनजी ज्वेलर्स दाजीकाका गाडगीळ यांनी पुण्यात सुरु केले. ग्राहकांना उत्तम दागिने देऊन  आणि दररोज जास्तीत जास्त ग्राहकांपर्यत पोहोचून आम्ही आमचा विस्तार सुरू ठेवू’.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZXXBH
Similar Posts
दाजीकाका गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर पुणे : ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे दाजीकाका गाडगीळ करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची दुसरी आवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्या ११ ते २१ सप्टेंबरदरम्यान विविध शहरांत होणार असून, अंतिम फेरी २५, २६ सप्टेंबरला पुण्यात होणार आहे. पुण्यात तीन ऑगस्टला झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली
‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे मंगळसूत्र महोत्सव पुणे : आघाडीचा ज्वेलरी ब्रँड असलेल्या ‘पीएनजी ज्वेलर्स’ तर्फे १२ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान ‘मंगळसूत्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘पीएनजी’च्या दुकानांत मिळणार ‘फॉरएवरमार्क’ हिरे पुणे : मूल्य आणि विश्वासाचे उत्तम उदाहरण असलेल्या पीएनजी ज्वेलर्स ब्रँडने ‘फॉरएवरमार्क’ या डी बिअर्स ग्रुपच्या हिरेब्रँडशी भागीदारी केली असून, ‘पीएनजी’च्या भारतातील सर्व दुकानांमध्ये आता ‘फॉरएवरमार्क’ हिऱ्यांची विक्री केली जाणार आहे.
पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर पुणे : सणासुदीच्या काळात ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पीएनजी ज्वेलर्सतर्फे प्युअर हॅपिनेस ऑफर सादर करण्यात आली आहे. याअंतर्गत ग्राहकांना हिऱ्यांचे दागिने एक लाख १९ हजार रुपयांपासून उपलब्ध करण्यात आले आहेत. याशिवाय सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर २० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात आली आहे. ही ऑफर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language